रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांच्या बँक खात्यावर ५९२ कोटी ३४ लाख ९० हजाराची मदत डीबीटीद्वारे वर्ग…नाशिक विभागाला मिळाले इतक्या कोटीची मदत

by India Darpan
फेब्रुवारी 6, 2025 | 6:55 pm
in संमिश्र वार्ता
0
maha gov logo

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवेळी शासन निकषानुसार मदत जाहीर केली होती. यातील 5 लाख 39 हजार 605 लाभार्थ्यांना 592 कोटी 34 लाख 90 हजार 530 रुपयांची मदत संबंधित लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

आधारसंलग्न बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेल्या मदतीमध्ये अतिवृष्टी/पूर सन 2022, सन 2023, सन 2024, अवेळी पाऊस 2022-2023, व 2023-2024, अवेळी पाऊस/अतिवृष्टी 2023-2024, दुष्काळ 2023 आणि जून 2019 मध्ये वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थींचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना शासनाकडून ही मदत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग झाल्यामुळे या घटकांना दिलासा मिळेल, असा विश्वासही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले, या मदतीमध्ये अमरावती विभागामध्ये 4 हजार 671 लाभार्थ्यांना 7 कोटी 40 लाख 29 हजार 820 रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे. यात अकोला जिल्ह्यातील 363 लाभार्थ्यांना 51 लाख 96 हजार 942 रुपये, अमरावती जिल्ह्यातील 1 हजार 630 लाभार्थ्यांना 3 कोटी 61 लाख 81 हजार 886 रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 674 लाभार्थींना 1 कोटी 2 लाख 54 हजार 387 रुपये, वाशिम जिल्ह्यातील 401 लाभार्थींना 49 लाख 19 हजार 488 रुपये तर यवतमाळ जिल्ह्यातील 1 हजार 603 लाभार्थींना 1 कोटी 74 लाख 77 हजार 118 रुपयांची मदत वर्ग केली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 4 लाख 83 हजार 883 लाभार्थींना 514 कोटी 85 लाख 23 हजार 260 रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे. यात बीड जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार 910 लाभार्थींना 106 कोटी 12 लाख 77 हजार 422 रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 हजार 463 लाभार्थींना 2 कोटी 42 लाख 73 हजार 471 रुपये, धाराशिव जिल्ह्यातील 27 हजार 307 लाभर्थ्यांना 36 कोटी 24 लाख 7 हजार 748 रुपये, हिंगोली जिल्ह्यातील 56 हजार 81 लाभार्थीना 69 कोटी 71 लाख 979 रुपये, जालना जिल्ह्यातील 8 हजार 245लाभार्थींना 10 कोटी 74 लाख 76 हजार 397 रुपये, लातूर जिल्ह्यातील 23 हजार 841 लाभार्थींना 21 कोटी 34 लाख 43 हजार 75 रुपये, नांदेड जिल्ह्यातील 2 लाख 33 हजार 242 लाभार्थींना 250 कोटी 28 लाख 1 हजार 952 रुपये आणि परभणी जिल्ह्यातील 15 हजार 794 लाभार्थींना 17 कोटी 97 लाख 42 हजार 217 रुपये बॅक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत.

कोकण विभागामध्ये 865 लाभार्थ्यांना 21 लाख 81 हजार 781 रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 16 लाभार्थ्यांना 1 लाख 10 हजार 487 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 3 लाभार्थ्यांना 8 हजार 600 रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 703 लाभार्थ्यांना 12 लाख 88 हजार 634 रुपये, ठाणे जिल्ह्यातील एका लाभार्थीस 9 हजार रुपये, पालघर जिल्ह्यातील 142 लाभार्थीना 7 लाख 65 हजार 60 रुपये बॅक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत.

नागपूर विभागात 20 हजार 898 लाभार्थींना 26 कोटी 43 लाख 10 हजार 864 रुपये बॅक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील 176 लाभार्थीना 22 लाख 56 हजार 210 रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील 5 हजार 288 लाभार्थीना 4 कोटी 86 लाख 74 हजार 753 रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील 6 हजार 752 लाभार्थ्यांना 8 कोटी 11 लाख 94 हजार 213 रुपये, गोंदिया जिल्ह्यातील 3 हजार 146 लाभार्थींना 4 कोटी 12 लाख 47 हजार 223 रुपये, नागपूर जिल्ह्यातील 3 हजार 874 लाभार्थींना 7 कोटी 40 लाख 30 हजार 676 रुपये तर वर्धा जिल्ह्यातील 1 हजार 662 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 1 कोटी 69 लाख 7 हजार 790 रुपये डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत.

नाशिक विभागात 1 हजार 909 लाभार्थ्यांना 2 कोटी 71 लाख 91 हजार 791 रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात 228 लाभार्थींना 29 लाख 66 हजार 546 रुपये, धुळे जिल्ह्यातील 115 लाभार्थीना 13 लाख 61 हजार 437 रुपये, जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 26 लाभार्थींना 1 कोटी 87 लाख 29 हजार 795 रुपये, नंदूरबार जिल्ह्यातील 8 लाभार्थींना 1 लाख 22 हजार 315 रुपये तर नाशिक जिल्ह्यातील 532 लाभार्थींना 40 लाख 11 हजार 699 रुपयांची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात अली आहे.

पुणे विभागात 27 हजार 379 लाभार्थींच्या बँक खात्यावर 40 कोटी 72 लाख 53 हजार 13 रुपयांची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 64 लाभार्थ्यांना 99 लाख 62 हजार 37 रुपये, पुणे जिल्ह्यातील 3 हजार 383 लाभार्थ्यांना 2 कोटी 32 लाख 45 हजार 952 रुपये, सांगली जिल्ह्यातील 1 हजार 787 लाभार्थ्यांना 1 कोटी 77 लाख 44 हजार 279 रुपये आणि सोलापूर जिल्ह्यातील 21 हजार 145 लाभर्थ्यांना 35 कोटी 63 लाख 745 रुपये रुपयांची मदत डीबीटीद्वारे आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय सुकाणू समितीमध्ये शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांची निवड

Next Post

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट

India Darpan

Next Post
IMG 20250206 WA0350

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट

ताज्या बातम्या

Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011