इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य शासनाचे बदल्याचे सत्र सुरुच असून वेगवेगळ्या विभागातील पाच अधिका-यांच्या आता बदल्या करण्यात आल्या आहे. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर या बदल्या करण्यात आल्या असून त्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची बदली जालना जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. पण, त्यांच्या जागी अजून कोण अधिकारी येणार हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.
राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्यात अजीज शेख, भाप्रसे, व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई. यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे. या पदावर बदली करण्यात आली आहे. अशीमा मित्तल, भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यांची नाशिक येथून जिल्हाधिकारी जालना या पदावर बदली करण्यात आली आहे. श्रीकृष्णनाथ पांचाळ, भाप्रसे, जिल्हाधिकारी,जालना. येथून जिल्हाधिकारी, ठाणे. या पदावर बदली करण्यात आली आहे. विकास खारगे, भाप्रसे, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,मंत्रालय, मुंबई.येथून अप्पर मुख्य सचिव महसूल मंत्रालय,मुंबई.या पदावर बदली करण्यात आली आहे. अनिल डिग्गीकर, भाप्रसे, अप्पर मुख्य सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई. येथून अपर मुख्य सचिव, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय,मुंबई.या पदावर बदली करण्यात आली आहे.
या बदल्यानंतर सुध्दा आणखी काही अधिका-यांच्या बदल्या होणार आहे.