विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारताचा अर्थमंत्री अशी ओळख असलेला मान्सून यंदा वेळेवर म्हणजे या महिन्याच्या अखेरीसच भारतात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेल्या आठवड्यात अरबी समुद्रामध्ये आलेले तौक्ते हे चक्रीवादळ आणि सध्या बंगालच्या उपसागरात आलेले यास चक्रीवादळ यामुळे मान्सूनच्या आगमनावर परिणाम होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, मान्सूनवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. मान्सून वेळेतच म्हणजे येत्या ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. अंदमानच्या भागात मान्सूनच्या हालचाली आजच पहायला मिळाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही भारतासाठी शुभचिन्हे आहेत. मात्र, मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होईल, हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. येत्या १० जूनच्या दरम्यान मान्सून महाराष्ट्रात वर्षाव करणार आहे. १० ते १५ जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून बरसणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मान्सूनच्या यंदाच्या प्रवासाचा हवामान विभागाने प्रकाशित केलेला नकाशा असा