इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
‘हॉटस्टार’वर प्रसारित होणाऱ्या भारत-इंग्लंड टी-२० सामन्याचं समालोचन हरयाणवी आणि भोजपुरी भाषेतूनही केलं जात आहे, पण यात मराठी भाषा नाही. अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठीला ही अशी वागणूक देण्याची हिंमतच कशी होते? स्टार नेटवर्क यांना अभिजात म्हणजे काय त्याचा मनसे स्टाईल धडा द्यावाच लागेल असा इशारा मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी दिल्यानंतर आज थेट त्यांनी स्टार नेटवर्कचे कार्यालय गाठले. त्यानतंर अमेय खोपकर, संतोष धुरी, केतन नाईक यांनी येथील अधिका-यांना जाब विचारला. यावेळी पोलिस देखील कार्यालयात उपस्थितीत होते.
यावेळी मनसे नेते अमेय खोपकर यांनी थेट मंत्री उदय सामंत यांना फोन लावला. हॅाटस्टारच्या अधिका-यांकडून मराठी भाषेची अमलबजावणी होईल असे लेखी पत्र घ्या,असेही यावेळी ठरले. त्यानंतर हॅाटस्टारच्या अधिका-यांनी संबधीत अधिकारी संजोग गुप्ता नाही असल्याचे सांगितले. त्यानंतर खोपकर यांनी मला लेखी द्या मी निघालो असे सांगितले.
https://twitter.com/MNSAmeyaKhopkar/status/1883368555279991209