नाशिक : गोपाळ काला निमित्त दही हंडी फोडणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडले आहे. विनापरवानगी आणि मनाई आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज घोडके,संदिप भवर,सौरभ सोनवणे,अरूण दातीर,विजय ठाकरे,कौशल पाटील व तुषार बंधूरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्यांची नावे आहेत. राज्यात दही हंडी फोडण्यास शासनाने बंदी घातलेली असतांना तसेच शहरात मनाई आदेश जारी असतांना संशयीतांनी मंगळवारी (दि.३१) शहरातील मनसे कार्यालयासमोर प्रतिकात्मक विनापरवानगी दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजीत केला. याप्रकरणी पोलीस नाईक श्रीकांत महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक घोरपडे करीत आहेत.