मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी १५ ऑगस्टपासून कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकलने प्रवास करता येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. तर विरोधी पक्षांनी या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला. पण, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयात उपस्थितीतीचा मुद्दा मांडला आहे. कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घरुनच काम करणे जास्त पसंत केले. त्यामुळे त्यांच्या मंत्रालयातील उपस्थितीती बाबत भाजपनेही टीका केली होती. मंत्रालयात त्यांची उपस्थिती कोरोना काळात क्वचितच राहिली. त्यामुळे लोकल सुरु करण्याच्या घोषणेनंतर देशपांडे यांचे हे ट्विट चांगलेचे चर्चेत आहे.
देशपांडे यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. आंदोलन,याचिका, पत्र, विनंती, त्रागा, धमकी, बातमी लावून धरण आणि इतर अनेक उपाय या माध्यमातून लोकल 15 ऑगस्ट ला चालू करण्याची आपण घोषणा केली. असो आपलं अभिनंदन आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या 15 ऑगस्ट पासून सोडवाल या साठी याचिका करू का आंदोलन हे ही सांगा. आता या ट्विटला शिवसेना कसे उत्तर देते हे महत्त्वाचे आहे.
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1424543832448790530?s=20