नाशिक – मनेसचे युवा नेते अमित ठाकरे नाशिक दौ-यावर असून उद्या ते सकाळी १० वाजता राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून मनसेच्या सत्ताकाळात नाशिक महानगरात साकारलेल्या विविध पथदर्शी प्रकल्पांना भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता मनपा आयुक्त यांची भेट घेऊन मनसेच्या सत्ताकाळात नाशिक महानगरात साकारलेल्या विविध पथदर्शी प्रकल्पांच्या देखरेखी बाबत चर्चा करणार आहे. त्यानंतर ते महानगरपालिका येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमानंतर चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजगड येथून जीवनावश्यक साहित्य व मदत घेऊन निघणाऱ्या वाहनांना नारळ फोडून ते निरोप देणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती मनसे प्रवक्ते पराग शिंदे यांनी दिली आहे. अवघ्या काही महिन्यावर महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. त्यामुळे त्याची मोर्चेबांधणी मनसेकडून सुरु असून अमित ठाकरे हे दुस-यांदा नाशिक दौ-यावर आले आहे. त्यांच्यावर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली असून ते कार्यकर्त्यांची संवाद साधत आहे. त्याचबरोबर विविध कार्यक्रम व भेटी त्यांच्या या दौ-यात आहे.