इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा. जेव्हा एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना विचारा अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे दौ-यावर असतांना दिली.
आज त्यांनी ठाण्यातील पदाधिका-यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला. गेल्या दोन दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय. त्यावर राज ठाकरे म्हणाले एकनाथ शिंदे मागच्यावेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आले, या प्रश्नांची सगळी उत्तरं एकनाथ शिंदे देतील.
मनोज जरांगे पाटील यांचे आज दुस-या दिवशी आंदोलन सुरु असून त्यामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी झाली आहे.