इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. काल २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे आणि त्याबद्दल तमाम मराठी जनांचं मनापासून अभिनंदन. येत्या ५ तारखेला विजयी मेळावा होईल. या मेळाव्यात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मेळावा असेल. आणि अजून एक गोष्ट मी पुन्हा एकदा सांगितली ती म्हणजे सरकारने जी काही नवीन समिती नेमली आहे तिचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवली जाणार नाही हे नक्की.
बाकी ५ तारखेच्या विजयी मेळाव्याचे तपशील लवकरच कळवण्यात येतील.
बघा, राज ठाकरे यांची लाईव्ह पत्रकार परिषद…
बघा, राज ठाकरे यांची लाईव्ह पत्रकार परिषद…