इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
५ जुलै रोजी शाळेतील सक्तीच्या हिंदी विरोधात पक्षविरहित सर्व मराठी बांधवांचा मोर्चा आयोजित केला आहे. कोणत्याही राजकीय मागणीसाठी नव्हे, तसेच कोणत्याही भाषेचा द्वेष म्हणून नव्हे तर आपल्या मायबोली मराठी वरील प्रेम या मोर्चातून व्यक्त करण्यासाठी माझी सर्वांना विनम्र विनंती आहे की तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने सहपरिवाराने उपस्थिती नोंदवावी अशी आवाहन करणारी पोस्ट माजी आमादर बाळ नांदगाव यांनी केली आहे.
या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एकीचे बळ या म्हणी प्रमाणे आपल्या भाषेसाठी तरी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र येऊन लढा द्यायची हीच ती वेळ. आपली मराठी ही आपली खास ओळख आहे आणि मराठीच आपली कायमस्वरूपी ओळख रहावी यासाठी हा मोर्चा. “ठाकरेंच्या” व “मराठी माणसांच्या” निर्धाराने निघणाऱ्या या “सर्वपक्षीय” तरीही “पक्षविरहित” मोर्चाला आपली भेट होईलच.जय महाराष्ट्र असे म्हटले आहे.
या पोस्टमध्ये राज ठाकरे यांचा मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा असे वाक्य असलेल्या पोस्टरवर सही करतांनाचा फोटोही त्यांनी पो्स्ट केला आहे.