इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जेएनपीटी साठी होणाऱ्या नोकरी भरतीच्या मुलाखती या गुजरात मध्ये होणार अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्याची माहिती दिली. आज अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने जेएनपीटीचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांची भेट घेऊन तात्काळ ती जाहिरात रद्द करून घेतली. तसेच पुढील सगळ्या मुलाखती महाराष्ट्रात झाल्या पाहिजेत अशी सख्त ताकीद दिली. त्यानंतर जेएनपीटीचे अध्यक्ष यांनी भविष्यात होणाऱ्या नोकरी भरतीमध्ये सगळी मराठी मुलं असतील अशी ग्वाही दिली.