पुणे – मी सध्या खडसे यांची सीडीची वाट पाहतोय असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईडीवर निशाना साधला. यावेळी ते म्हणाले की, तपास यंत्रणाचा गैरवापर केला जातो आहे. तपास यंत्रणा तुमच्या हातातील बाहुली नव्हे. असे सांगत त्यांनी ईडीच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. काँग्रेसचे सरकार असताना व भाजपचे सरकार असतानाही गैरवापर होत आहे. या यंत्रणांचा चुकीचा वापर करून चालणार नाही. ज्यांनी गुन्हे केले ते मोकाट आहेत. आणि इतरांवर कारवाई होत आहे. हे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.
राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौ-यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा पुणे दौ-यावर आहे. सकाळी त्यांच्या हस्ते पुणे मनसे कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. उदघाटनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, मराठा व ओबीसी आरक्षण सर्वांना मान्य आहे. तर अडलं कुठे असा प्रश्न त्यांनी केला. आरक्षणाच्या मुद्दयावर केवळ माथे भडकावून राजकारण करायचे का ? असा प्रश्नही त्यांनी केला. यावेळी त्यांनी कोर्टात व्यवस्थित भूमिका का मांडली जात नाही असेही ते म्हणाले. एकमेकांकडे बोट का दाखवत आहात ? एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा, असेही ते म्हणाले. निवडणुकीत हे नेते मतदान मागायला येतात. तेव्हा समाजाने या नेत्यांना जाब विचारावा. आमचा वापर तर केला जात नाही ना ? याचाही समाजाने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.
यावेळी केंद्र सरकारने सहकार खाते नव्याने निर्माण केले. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळींना धोका निर्माण झाला का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी पवार साहेबांना विचारा, तेच करेक्ट सांगतील असे सांगत हा प्रश्न टोलावला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कारभारावर त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी लॅाकडाऊनमुळे सरकारचा काम पाहता आला नाही. त्यामुळे समाधान कशावर व्यक्त करायचे असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी या दौ-याची माहिती दिली.