नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसेला पहील्यांदांच नाशिक महापालिकेची सत्ता आली. त्यावेळी पुढच्या ५० वर्षाचा वाढती लोकसंख्याचा विचार करून पाणी प्रशन सोडवले. तसेच भारतरत्न रतन टाटा यांच्या सहकार्याने नाशिक मध्ये बॅाटनिकल गार्डनसह अधुनिक रस्ते व इतर चौफेर विकास केला असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. यावेळी त्यांनी येणा-या काळात सातपूर, अंबड, सिडको औद्योगिक नगरीसह उत्तर महाराष्ट्रातील तरूण तरूणींना विदेशात नोकरीला जाऊ नये म्हणून नाशिक मध्येच आयटी पार्क आणणार असल्याचे सांगितले. त्यासाठी धडाडीचे मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.
सातपूर येथील आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी मनसे नेते अतुल चाडंक, डॅा. प्रदीप पवार, सलिम शेख, योगेश शेवरे, सुधाम कोंबडे, मनोज अहीरे. तसेच पश्चिम विधानसभेचे उमेदवार दिनकर पाटील. देवळाली मतदार संघातील मोहिनी गोकुळ जाधव, इगतपुरी त्रंबक मतदार संघाचे काशीनाथ मेंगाळ व नाशिक पूर्वचे उमेदवार प्रसाद सानप आदीसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी सांगितले की, सर्व सामान्यांचे मुलभूत गरजांकडे लक्ष जाऊ नये म्हणून तुम्हाला जाती-जातींमध्ये विभागून टाकलं आहे. लोकांनाही जातींमध्ये लढवून, गुंतवूण टाकलं आहे. आपले महापुरुषही आपण जातींमध्ये विभागून टाकले आहेत. आमचे शिवछत्रपती मराठ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळ्यांचे, लोकमान्य टिळक ब्राम्हणांचे असं विभागलं गेलं आहे. २५ वर्षांपूर्वी अशा गोष्टी कुणाच्या मनातही यायच्या नाहीत. जातीबद्दल प्रेम हे मी समजू शकतो. पण शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस जन्माला आला आणि त्यांनी जाती-पातींमध्ये द्वेष निर्माण केला. १९९९ पासून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातींमध्ये द्वेष निर्माण झाला. अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
तसेच महिंद्रा अॅड महिंद्राचा प्रकल्प कसा नाशिकमध्ये थांबवला व पुढे विस्तार झाला याचेही किस्से सांगत औद्योगिक नगरीचा विकासासाठी दिनकर पाटील सह मनसेचे सर्व उमेदवार निवडून द्या असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
https://fb.watch/vUrjUrEGkx/