नाशिक – नाशिक महानगरपालिकेतर्फे गणेश उत्सव २०२१ हा पर्यावरण पूरक गणेश उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा या अनुषंगाने विविध उपक्रम नाशिक महानगरपालिकेच्या वतीने राबविले गेले. मनपाच्या या उपक्रमात नागरिकांचा सहभाग असावा या साठी मनपाने नाशिक शहरातील नागरिकांसाठी स्पर्धेचे आयोजन केले होते.पर्यावरण पूरक गणेश स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मा.आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे संपन्न झाला
नाशिक शहरातील नागरिकांसाठी मनपाच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती स्थापना ,पर्यावरण पूरक देखावा /आरास,पर्यावरणपूरक विसर्जन आदि तीन निकष होते व यासाठी प्रथम पारितोषिक र रु.१००००/-,द्वितीय र रु.५०००/-,व तृतीय र रु. ३०००/- ठेवण्यात आले होते. या स्पर्धेच्या अनुषंगाने शहरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.आलेल्या प्रवेशिकां मधून मनपाने नेमण्यात आलेल्या समिती द्वारे स्पर्धेसाठी ठरविलेले निकष पूर्ण करणारे प्रथम तीन क्रमांक निवडण्यात आले.त्यानुसार प्रथम क्रमांक श्रीमती रंजना अजय खिराटकर यांना देण्यात आला त्यांनी स्वत: घरी बनवलेली पर्यावरण पुरण शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना,कोरोनामुळे शाळा बंद असल्याने लहान मुलांवर होणारे परिणाम दाखवणारा देखावा तयार केला होता व घरीच कुंड तयार करून गणेश मूर्तीचे विसर्जन केले.द्वितीय क्रमांक मिळविलेल्या श्रीमती मनीषा सुभाष बोरसे यांनी पर्यावरण पुरण शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना ,पानाफुलांची आरास पाठ्यपुस्तक ,पाट्या आदींचा वापर करून पर्यावरणपूरक आरास व घरीच पर्यावरणपूरक विसर्जन केले. तृतीय क्रमांक मिळविलेल्या श्रीमती .स्नेहल प्रवीण खांदवे यांनी स्वत: घरीच बनवलेली पर्यावरण पुरण शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना,कोरोना काळात योगदान देणाऱ्या डॉक्टर्स , पोलीस , सफाई कर्मचारी आदींविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा पर्यावरण पूरक संदेश देणारा देखावा तयार करून घरच्या घरीच गणेश मूर्तीचे पर्यावरण पूरक विसर्जन केले.
या पर्यावरण पूरक गणेश स्पर्धेचे पारितोषक वितरण समारंभ मा. आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त (सेवा) प्रवीण आष्टीकर , अतिरिक्त आयुक्त (शहर) सुरेश खाडे , उपायुक्त (प्रशासन) मनोज घोडे पाटील , मुख्य लेखाधिकारी नरेंद्र महाजन , घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड , जनसंपर्क अधिकारी नितीन गंभिरे, शहर समन्वयक प्रशांत ठोके आदि उपस्थित होते. यावेळी प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या श्रीमती रंजना अजय खिराटकर यांनी पर्यावरण या विषयावर पुढील कविता सादर केली.
मान ठेवावा कलेचा ,स्पर्धेत हात साथीचा
भाव असावा भक्तीचा ,प्रदूषण मुक्त मातीचा
थर्माकोल प्लास्टिक बंदी करून नवीन कल्पना आनु चला
मूर्ती लहान संदेश महान , आपणही निसर्ग जपू चला