नाशिक – कोविड -19 चा नाशिक महानगर पालिका कार्यक्षेत्रातील प्रादुर्भाव बघता या वर्षाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक तथा नागरिकांमध्ये सोशल डीस्टेन्सची खबरदारी लक्षात घेऊन साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव २०२१ हा पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नाशिक महानगर पालिका प्रयत्नशील आहे. त्यामुळे समस्त गणेश भक्तांना आवाहन करण्यात येत आहे कि , प्रदूषण टाळा आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा. नाशिक महानगरपालिकने विसर्जनाकरिता उपलब्ध करून दिलेल्या नैसर्गिक व कृत्रिम तलावातच नागरिकांनी आपल्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करावे व प्रदूषण टाळून थर्माकोल व प्लास्टिकचा वापर टाळावे असे आवाहन केले आहे.
नाशिक महानगरपालिकेतर्फे गणेश विसर्जनाकरिता या ठिकाणी नैसर्गिक व कृत्रीम तलावांची सोय करण्यात आली आहे.