नाशिक – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाशिक महानगरपालिका हा गणेश उत्सव पर्यावरण पूरक गणेश उत्सव म्हणून साजरा करणार आहे. त्याच अनुषंगाने विविध उपक्रम नाशिक महानगरपालिलेच्यावतीने घेतले जात आहेत.कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांमध्ये फिजिकल अंतर (Social Distance) कसे राहील ही खबरदारी लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाशिक मनपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग यांच्या मदतीने नागरिकांसाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या बाप्पाचे विसर्जन त्यांच्या सवलीतप्रमाणे ( वेळेप्रमाणे ) व घरानजीकचे विसर्जन सेंटर कुठे आहे हे निवडून ऑनलाईन पद्धतीने स्लॉट बुक करून बाप्पाचे विसर्जन करता येणार आहे. ही सुविधा नाशिककरांसाठी सोमवार दिनांक ६ सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे या सुविधेमार्फत दीड, पाच, सात व दहा दिवसांच्या गणेश विसर्जनाकरिता ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग करता येणार आहे. या सुविधेला मागच्या वर्षी नागरिकांनी खूप छान प्रतिसाद दिला आहे. यावर्षी सुद्धा या सुविधेचा जास्तीत जास्त नाशिकरांनी लाभ घ्यावा व या कोविड काळात सर्व नियम पाळूनच गणेश विसर्जन करावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेने केले आहे. तसेच गणेश विसर्जनाकरिता ऑनलाईन पद्धतीने स्लॉट बुकिंग करणाऱ्या नागरिकांसाठी मनपातर्फे विसर्जनास्थळी प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे.
खालील संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा वेळेनुसार स्लॉट बुक करू शकता.
http://slotbooking.nmc.gov.in/ किंवा www.nmc.gov.in