नाशिक – नाशिक शहरासाठी पाटबंधारे विभागाच्या गंगापूर धरण समूह, दारणा धरण (चेहेडी बंधारा) व मुकणे धरण यातून रॉ वॉटर पंपीग करुन मनपाच्या सात जलशुध्दीकरण केंद्रामार्फत दैनंदिन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. सद्य:स्थितीत धरणाची पातळी खुपच कमी झाली आहे. अदयापपर्यंत पावसास सुरुवात झाली नसल्याने आगामी पाणी टंचाई निर्माण होऊ नये व पुरेशा प्रमाणात पाणी आगामी काळात ५० टक्के पर्यंत धरणात पाणी साठा उपलब्ध होईपर्यंत या अनुषंगाने दैनंदिन पाणी वापराचे फेरनियोजन करणे आवश्यक आहे. त्यानुसार किमान उपलब्ध पाणी साठा हा पिण्यासाठी पुरेल यासाठी नाशिक शहरात गुरुवारी दिनांक २२ जुलै रोजी व त्यापुढील आठवडयात प्रत्येक बुधवारी संपूर्ण शहरात संपुर्ण दिवस पाणी पुरवठा होणार नाही. याची नागरीकांनी नोंद घ्यावी. असे महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.
१) पाण्याचा अपव्यय अथवा पाण्याचा गैरवापर करणे. उदा.वाहने धुणे,बांधकामासाठी पाणी वापर करणे,पाण्याची नासाडी इ. करण्यात येऊ नये.
२) सर्व नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे.
३) पाणी शिळे होत नाही त्यामुळे उरलेले पाणी फेकून देऊ नये.
४) घराच्या पाण्याच्या टाक्या ओव्हर प्लो होणार नाही याची दक्षता घ्यावी व टाक्या ओव्हर प्लो होऊ नये यासाठी व्हॉल्व व लेव्हल सेंस्सरचा वापर करावा.