बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपली ताकद दाखवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास आणि गायक-अभिनेता निक जोनास यांनी चाहत्यांना खुशखबर दिली आहे. निक- प्रियांका सरोगसीच्या मदतीने आई-वडील बनले असून एका अमेरिकन वेबसाइटच्या दाव्यानुसार प्रियांका आणि निकच्या मुलीचा जन्म १५ जानेवारी रोजी दक्षिण कॅलिफोर्नियातील रुग्णालयात झाला आहे. तथापि, सरोगसीच्या मदतीने एखाद्या सेलिब्रिटीने पालक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर अनेक सेलेब्रिटिंनी सरोगसीच्या माध्यमातून पालक होण्याचा आनंद मिळवला आहे.
शाहरुख खान : बॉलिवूडमधील किंग ऑफ रोमान्स म्हटला जाणारा अभिनेता शाहरुख खान तीन मुलांचा बाप आहे. शाहरुख आणि गौरीने दोन मुलांनंतर अबराम खानसाठी सरोगसीचा अवलंब केला होता. अबरामचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत आणि चाहत्यांना त्याचे फोटो आणि व्हिडिओ खूप आवडतात.
आमिर खान : या यादीत शाहरुख खान व्यतिरिक्त बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टच्या नावाचाही समावेश आहे. आमिर खान आणि किरण यांचा मुलगा आझादचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे.
लिसा रे : बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे वयाच्या ४६ व्या वर्षी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली. मात्र, सोशल मीडियावर त्यांनी तब्बल तीन महिन्यांनी ही माहिती दिली होती.
तुषार कपूर आणि एकता कपूर: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा- मुलगी तुषार कपूर आणि एकता कपूर यांनाही सरोगसीद्वारे मुलाचे सुख मिळाले आहे. एकताच्या मुलाचे नाव लक्ष्य आणि तुषारच्या मुलाचे नाव रवी आहे.
सनी लिओन: अॅडल्ट इंडस्ट्रीनंतर बॉलिवूडमध्ये आपली ताकद दाखवणारी अभिनेत्री सनी लिओन तीन मुलांची आई आहे. सनीने २०१७ मध्ये निशा कौर नावाची मुलगी दत्तक घेतली आणि नंतर २०१८ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून त्यांना जुळी मुले झाली. आशर सिंग वेबर आणि नोहा सिंग वेबर अशी त्यांची नावे आहेत.
करण जोहर: बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक करण जोहर सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांचा पिता आहे. करण जोहरच्या मुलांचे नाव यश आणि रुही आहे.
सोहेल खान : सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा यांनीही सरोगसीचा अवलंब केला आहे. सोहेल आणि सीमा यांच्या पहिल्या मुलाचे नाव निर्वाण आहे, तर दुसऱ्या मुलासाठी योहानसाठी या जोडप्याने सरोगसीचा अवलंब केला.
कृष्णा आणि कश्मिरा शाह: कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा शाह आणि त्याची पत्नी कश्मिरा शाह यांनीही सरोगसीचा अवलंब केला आहे. कृष्णा- कश्मिराला दोन मुले आहेत,