मुंबई- चित्रपट सृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या विवाहाच्या चर्चा रंगतात, तशाच घटस्फोटाच्या देखील रंगतात. सध्या काही कलाकारांच्या घटस्फोटाच्या बातम्या खूपच चर्चेत आहेत. दक्षिणेतील सुपरस्टार धनुषने सोशल मीडियावर पत्नी ऐश्वर्या पासून विभक्त झाल्याबद्दल सोशल मीडियावरून सांगितले आहे. त्यांच्या घटस्फोटाची ही बातमी समोर आल्यानंतर अनेक जणांनी दु:ख व्यक्त केले. तसेच दक्षिणात्य अभिनेत्री समंथा आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र पुन्हा एकत्र येणार का ? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला, कारण त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांना घटस्फोटाबद्दल माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी वेगळे होण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले होते. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर काही कमेंट्स केल्या. काही नेटकऱ्यांनी समंथा आणि नागा चैतन्यला तेव्हा ट्रोल देखील केले होते. मात्र त्यानंतर घटस्फोटाबाबतची पोस्ट समंथाने सोशल मीडियावरून डिलीट केली आहे.
६ ऑक्टोबर २०१७ रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले. गेल्या काही दिवसांपासून समंथा आणि नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या, मात्र दोघांनीही घटस्फोट घेत असल्याचे सगळ्यांना सांगितले आहे. अभिनेत्री समंथा अक्कि हिने नागा चैतन्यशी लग्नानंतर अभिनेत्रीने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे आडनाव जोडले होते. समंथा आणि तिचा पती नागा चैतन्य यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या त्यानंतर तिने आपल्या नावापुढील आडनाव काढून टाकले आहे, असे म्हटले जात होते. अभिनेत्री समंथाने सोशल मीडियावर नवरा नागा चैतन्यपासून वेगळे होत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
‘आमच्या सर्व हितचिंतकांनो, खूप विचारविनिमयानंतर, सॅम आणि मी पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की, आमची मैत्री दहा वर्षांपेक्षा जास्त काळाची आहे, आताही मी आमच्यामध्ये नेहमीच एक विशेष नाते ठेवेल. आम्ही आमच्या चाहत्यांना, माध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्यावी आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्यावी. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार’, अशी पोस्ट लिहित आज समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, समंथा हिने तिच्या व नागा चैतन्यच्या घटस्फोटाबद्दल जी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या होत्या. आता तीने सदर पोस्ट डिलीट केली आहे. त्यामुळे आता समंथा आणि नागा चैतन्य पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.