नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरास रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निकटवर्तीय असलेल्या मनोज मोदी यांनी मंदिरातील सोन्याचा मुकुट बनविण्यासाठी सोनं देण्याचा निश्चिय केला होता. त्यानंतर आज सव्वा किलो सोने त्यांनी अर्पण केले. ज्याची बाजार भावाप्रमाणे किंमत अंदाजे १ कोटी रुपये आहे. मोदी यांचे सहकारी हितेश यांनी आज सपत्नीक येऊन हे सोनं मंदिर प्रशासनाकडे सुपूर्द केले.
देवस्थानच्या विश्वस्तांनी २०० वर्षांपूर्वीचा सुवर्ण मुकुट नव्याने बनविण्याचा संकल्प मोदी यांना सांगितला होता. देशभरातील भक्तांच्या सुवर्ण दानातून साडेआठ किलोचा सुवर्ण मुकुट बनविला जाणार आहे, त्यापैकी पाच किलोहून अधिक सोने देवस्थानला दानाच्या स्वरूपात प्राप्त झाले आहेत. आता, उर्वरित सोने अर्पण करण्याचे मनोज मोदी यांनी म्हटले होते. त्यानुसार सव्वा किलो सोनं अर्पण करण्यात आलं आहे.
मनोज मोदी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन असून उद्योगपती मुकेश अंबानी यांचे खास आहेत. अंबानी आणि मोदी हे कॉलेजपासूनचे मित्र असून ते ५५ वर्षांचे आहेत.