इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरु देऊ नका, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही असा इशारा आज मनोज जरांगे पाटील यांनी दिला. सत्ताधा-यांना मुंबईत येऊ द्यायचं नाही, त्यासाठी मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचं काम केले जात आहे. पण, यावेळी त्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही असेही जरांगे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही शांत बसतो म्हणून त्याचा फायदा उचलू नका, आता मुंबईत आरक्षण घेतल्याशिवाय परत जायचं नाही असेही त्यांनी सांगितले.
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी येणार आहे. त्याअगोदर त्यांनी बीडमध्ये एका संभेला संबोधित करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी मराठ्यांच्या पोरांना डिवचले तर मी सोडणार नाही असा इशाराही दिला.
यावेळे ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच २९ जाती या ओबीसी आरक्षणामध्ये घेतल्या. त्यांची मागणी नसतानाही त्यांना दिलं. पण, मराठ्यांची मागणी असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही. सगेसोय-यांची अंमलबजावणी केली जात नाही. ही पोटदुखी कशासाठी असा प्रश्नही त्यांनी विचारला.