जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन १५ ते २० जागांवर लढायचं आहे आणि उर्वरित मतदारसंघांमध्ये आपल्या भूमिकेला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडायचे आहे असे सांगितले होते. पण, आता त्यांनी थेट विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा सोमवारी सकाळी केली. यावेळी त्यांनी सर्व उमेदवारांना माघार घेण्याचे आवाहन केले. एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नाही असेही त्यांनी सांगितले. ह्याला पाडा, त्याला पाडा ही आपली भूमिका नाही, कुणालाही पाडा कुणालाही निवडून आणा असेही त्यांनी सांगितले. ही माघार नाही हा गनिमी कावा आहे. कोणत्याही अपक्षाला व राजकीय पक्षाला पाठींबा दिलेला नाही हे सुध्दा त्यांनी यावेळी सांगितले. मित्रपक्षाची यादी न आल्यामुळे एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी ही माघार घेतल्याचे कारण सांगितले.
काल जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले होते की, २५ मतदारसंघांवर चर्चा झाली आहे. ज्या मतदारसंघाची नावे येणार नाहीत तेथे आपले अर्ज काढून घ्या. आपल्याला आपल्या स्वार्थासाठी लढायचं आहे. आपल्याला आपल्यासाठी दहा ते पाच असेनात, पण निवडून आणायचं आहे. गोरगरीब उमेदवाराला पैशाचा ताकदीवर दमदाटी केली तर आम्ही आमच्या मतदानातून तुम्हाला ताकद दाखवणार. दुसऱ्या जिल्ह्यात तुमच्या पक्षाचा उमेदवार पाडलाच म्हणून समजावे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. पण, आज सोमवारी त्यांनी नऊ वाजता परिषद घेत आपली भूमिका जाहीर करुन विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाचा सर्वांनाच धक्का बसला.
राज्यात या विधानसभा मतदार संघात उमेदवार देणार होते
१) केज – बीड जिल्हा –
२) बीड – बीड जिल्हा –
३) दौंड – जिल्हा पुणे –
४) पार्वती- जिल्हा पुणे –
५) परतूर – जालना जिल्हा –
६) फुलंब्री – छत्रपती संभाजीनगर जिल्हा –
७) हिंगोली – हिंगोली जिल्हा –
८) पाथरी, परभणी जिल्हा –
९) हदगाव – जिल्हा नांदेड –
१०) कळंब – जिल्हा धाराशिव –
११) भूम-परांडा – जिल्हा धाराशिव –
१२) करमाळा – जिल्हा सोलापूर-
१३) निलंगा – जिल्हा लातूर –
तर या मतदार संघावर चर्चा सुरु होती
पाथर्डी – जिल्हा नगर
कोपरगाव – जिल्हा नगर
पाचोरा – जिल्हा जळगाव
करमाळा – -जिल्हा सोलापूर
माढा –जिल्हा सोलापूर
धुळे शहर -जिल्हा धुळे
निफाड -जिल्हा नाशिक
नांदगाव – जिल्हा नाशिक