इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत अंतरवाली सराटीत आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नेमानी उपस्थितीत होते. या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उद्या रविवारी सकाळी ७ वाजता राज्यातील सर्व उमेदवारांनी अंतरावली सरावटीत चर्चेला यावे असे आवाहन केले.
३ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची घोषणा जरांगे पाटील करणार आहे. त्यामुळे सायंकाळी ५ किंवा रात्री १० पर्यंत चांगल निर्णय येईल असे जरांगे पाटील यांनी सांगितले. दरम्यान आज स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून निवडणूक लढवणा-या उमेदवारांना ताकत द्यावी अशी मागणी केली आहे.
दोन दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी दलित, मुस्लिम व मराठा समाजाची मोट बांधण्याची घोषणा केली. त्यानतंर आज जागा वाटपाबाबत बैठक झाली. उद्या काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.