इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सरपंचाचा काही उपयोग नाही सध्या उपसरपंच सर्व कारभार हाकतो. देवेंद्र फडणवीस सर्व कारभार पाहतात, सरपंचाच्या हातात काही नाही असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी पु्न्हा फडणवीसांवर टीका केली. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक मनोज जरांगे यांना सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांनी सरकारला फटकारले आहे.
यावेळी ते म्हणाले की, फडणवीसांनी कितीही गणित करुन द्या मी त्यांची सगळी गणितं फेल करणार. तुम्ही महाराष्ट्राच्या मराठ्यांना मूर्ख समजता का असा सवाल करत त्यांनी राजकीय वाटेवर आले तर तुमचा खेळ खल्लास असेही त्यांनी सांगितले. मागण्या मान्य करा नाहीतर सर्वाचं राजकीय करियर उध्वस्त करुन टाकेन असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
भारतात अशी जात नसेल ज्यांना वर्षभर सरकारला सहकार्य केलं, ती मराठा जात आहे. आम्हाला काहीतरी मर्यादा आहेत. आमच्यावर काही समाजाची जबाबदारी आम्ही वर्षभर तुम्हाला मदत आणि सहकार्य करत आहोत. तरी सुध्दा तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल तर कोणते सरकार तुम्ही चालवता. आणि कशाला चालवतात असा सवालही त्यांनी केला. उलट तुम्हाला वाईट वाटायला पहिजे लाज वाटायला पहिजे, एक वर्ष आंदोलन सुरु आहे. आणि आपण काहीच करु शकत नाही असेह जरांगे पाटील यांनी सांगितले.
धनगर, मुस्लिम, दलित गोरगरीब ओबीसी ना वेड्यात काढतात. फडणवीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो सगळया विषयाची अंमलबजावणी करा, मुख्यमंत्र्यांच्या पोटात काही नाही म्हणत आहेत तर आम्ही तेच म्हणत आहोत. म्हणूनच वर्षभर आम्ही सहकार्य केले अजून किती दिवस, निवडणुका तुमचा पोळा जवळ आला. त्यांच्यानंतर मात्र मी नीटच करणार. सध्या कोणावर बोलणार नाही मात्र नंतर सगळ्यांचाच हिशोब करतो असेही त्यांनी सांगितले. धनगरांना आणि सर्वांनाच मुसलमानांना देखील फडणवीसच अडथळा होता. शेतक-यांच्या प्रश्नाला देखील तेच अडथळा आहेत. गोरगरीब ओबीसींच्या आणि मराठ्यांचा प्रश्नाला तेच अडथळा आहेत. सरपंचाचा काही उपयोग नाही सध्या उपसरपंच सर्व कारभार हाकतो. देवेंद्र फडणवीस सर्व कारभार पाहतात, सरपंचाच्या हातात काही नाही असे त्यांनी सांगितले.