इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सरकारने काढलेल्या जीआरमुळे सर्व मराठे ओबीसीत जाणार म्हणजे जाणार असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. काही लोकांचे ऐकून गैरसमज करुन नका असे सांगत त्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. यावेळी ते म्हणाले किडे मकोडयांचं ऐकू नका, राईट काम होणार आहे. मराठ्यांनी डोकं चालवायचं, काही जण शत्रुच्या टोळीत राहीलेले आहेत, काहींना कोलत चला, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असंही त्यांनी सांगितले.
मराठे आरक्षणात गेले हे सिध्द झालं आहे. हा जीआर खोटा असता तर उडाला असता, काही जण म्हणतात जीआर खोटा काही नाही. निर्भीड राहायचं, सरसकट झालं असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
आमरण उपोषण संपल्यानंतर अनेकांनी सरकारने मान्य केलेल्या मागण्यांवर प्रश्न उपस्थितीत केले. त्यामुळे जरांगे पाटील यांनी सर्वांना उत्तर दिले.