इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा आरक्षणसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत ढासळली आहे. आज आंदोलनाचा पाचवा दिवस असून सरकारने अद्याप कोणताही तोडगा न काढल्यामुळे या आंदोलनाची धग वाढणार आहे. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरुन आंदोलकांना दूर करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आंदोनलाच्या ठिकाणी आणखी मोठा मंडप उभारण्यात आला आहे.
न्यायालयाच्या निर्देशानंतर मध्यरात्री मुंबई पोलिसांनी आझाद मैदान परिसरात, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलकांच्या उभ्या गाड्या पोलिसांनी काढायला सुरुवात केली. तसेच हा परिसर पालिकेच्या वतीने स्वच्छ करण्यात येत आहे. पोलिसांनी आंदोलकांच्या गाड्या वाशी मार्केटला नेण्यास स्पीकरवर सांगण्यास सुरुवात केली आहे.
या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्त, जेवण, फेळ आणि पाणी मैदानात येत आहे. यात अन्नाची नासाडी देखील होत होती. हे ऱोखण्यासाठी आता आझाद मैदानात आंदोलकांकडून एक गोदाम तयार करण्यात आले आहे.