इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई येथे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचा आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून काल रात्रीपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत हालचाली वाढल्या आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे.त्यांनी उद्यापासून पाणी पिणं बंद करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार आहे.
ते पुढे म्हणाले की, मी काल आणि आज पाणी पिलो आहे. उद्यापासून पाण पिणे बंद करणार आहे. सरकार मागण्यांची अंमलबजावणी करत नाही. त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. उद्यापासून कडक आमरण उपोषण सुरु करणार आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, गेल्या ७० वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण असून ते दिलं गेलं नाही, आरक्षणाची लेकरांची वेदना आहे. गरीब लोक हे मुंबईला आले आहेत. सगळ्या जातीचे लोक गोरगरीब मराठा समाजाची सेवा करत आहेत. राज्यातील गोरगरीब मराठा जर मुंबईत येत असतील तर आपली गाडी ग्राऊंडला लावा आणि रेल्वेने आझाद मैदानात या असे आवाहन त्यांनी केले.
मुंबईत हालाचील वाढल्या
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण व सुविधांसाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली. आता पुन्हा ही बैठक होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील आपले सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द केले असून ते मुंबईला तातडीने रवाना झाले आहे.
दरम्यान अगोदर बैठकीत मराठा आरक्षणाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा होऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मराठा आरक्षण या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे, अशी समितीची आणि राज्य सरकारची भूमिका आहे.