मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्ती मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी पाळल्या नाहीत. त्यामुळे मनोज जरांगेना तातडीने अटक करा, त्यासोबत त्यांना भेटलेल्या खासदार, आमदारांनाही अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिस महासंचालकांकडे केली आहे. तसचे मुंबई पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक आझाद मैदान यांच्याकडेही त्यांनी तक्रार केली आहे. पण, दरम्यान जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे.
जरांगे पाटील यांच्याकडून आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर ही परवानगी देण्यात आली. दरम्यान बहुतांशी आंदोलक हे वाशीच्या दिशेने निघाले आहेत. येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत ईस्टर्न वे फ्री आता मोकळा झाला आहे. कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी राहिली नाही. एका मागे एक आंदोलकांच्या गाड्या आणि टेम्पो हे वाशीच्या दिशेने जात आहे..