मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मराठा आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील हे बुधवारी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. त्यानंतर ते आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करत आहे. या आंदोलनात मोठे शक्तीप्रदर्शनही करण्यात आले. हजारो गाडंयांचा ताफा मुंबईत पोहचला आहे. यावेळी मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही असे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर सरकारने आता चर्चेसाठी यावे असेही त्यांनी आवाहन केले. या सर्व घडामोडीनंतर आता राज्य सरकारचे प्रतिनिधी आझाद मैदान येथे भेट घेऊन चर्चा करणार आहे.
जरांगे पाटील जुन्नर, राजगुरु नगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर असा प्रवास करत ते मुंबईत दाखल झाले आहे. या सर्व घडामोडीनंतर मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदावरील आंदोलनासाठी पोलिसांनी परवाणगी दिली आहे. ही परवानगी सध्या केवळ एक दिवसासाठी असून त्यामध्ये अटीशर्थीही घालण्यात आल्या आहे. आदोलनाची वेळ ९ ते सायंकाळी ६ असणार आहे. त्यानंतर आंदोलकाला थांबता येणार नाही. विशेष म्हणजे या आंदोलनात पाच हजार आंदोलकांना उपस्थिती राहण्याचे सांगितले आहे. पण, आता जरांगे पाटील यांनी डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही असे सांगितल्यामुळे सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे.
या अगोदर न्यायालयाने अधिका-यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. त्याचवेळी जरांगे यांनी निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबई सारखी पर्यायी जागा उपलब्ध करुन देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे असे खंडपीठाने नमूद केले. पण, सरकारने आझाद मैदानावर काही अटी व शर्थी घालून परवानगी दिली. पण, प्रश्न कायम आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही कायदा संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करु, असे सांगितले तर दुसरीकडे इथून उठायचं नाही असे सांगितले. त्यामुळे आता चर्चेनंतर यावर काय निर्णय होतो हे समोर येणार आहे.