मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मराठा आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील हे बुधवारी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. त्यानंतर ते आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झाले आहे. ते आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे. या आंदोलनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईच्या वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहे.
जरांगे पाटील जुन्नर, राजगुरु नगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर असा प्रवास करत ते मुंबईत दाखल झाले आहे. या सर्व घडामोडीनंतर मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदावरील आंदोलनासाठी पोलिसांनी परवाणगी दिली आहे. ही परवानगी सध्या केवळ एक दिवसासाठी असून त्यामध्ये अटीशर्थीही घालण्यात आल्या आहे. आदोलनाची वेळ ९ ते सायंकाळी ६ असणार आहे. त्यानंतर आंदोलकाला थांबता येणार नाही. विशेष म्हणजे या आंदोलनात पाच हजार आंदोलकांना उपस्थिती राहता येणार आहे.
पण, दुसरीकडे सरकारमधील वरीष्ठ मंत्री मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा करत आहे. गणेशोत्सवानिमित्त गर्दीमुळे कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सरकारतर्फे मोर्चा मध्येच थांबवण्याचे प्रयत्न सुरु होते. याबाबत चर्चाही झाली. सरकारने परवानगी दिली असली तरी जरांगे पाटील यांच्याबरोबर असलेल्यांची संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.
या अगोदर न्यायालयाने अधिका-यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. त्याचवेळी जरांगे यांनी निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबई सारखी पर्यायी जागा उपलब्ध करुन देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे असे खंडपीठाने नमूद केले. पण, सरकारने आझाद मैदानावर काही अटी व शर्थी घालून परवानगी दिली. पण, प्रश्न कायम आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही कायदा संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करु, असे सांगितले आहे.