नाशिक – मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी मनमाड शहरात मराठा क्रांती मोर्चा व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जोरदार निर्दशने करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन करून आंदोलनाला सुरवात करण्यात आली. मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र व राज्य सरकारने मराठा समाजच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करीत संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. महिलांची संख्याही लक्षणीय होती. मराठा आरक्षण व समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा पुढे निवडणुकांवर बहिष्कार टाकून आंदोलन तीव्र करण्याची इशारा आंदोलकांनी दिला.