सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड शहराचे आराध्य दैवत असलेल्या भक्तांच्या नवसाला पावणा-या श्रीनिलमणी गणेशाच्या दहा दिवसांच्या उत्सवाला आज पासून सुरुवात झाली असून, उत्सव मुर्तीची दरवर्षी प्रमाणे पारंपारिक पुणेरी पध्दतीने पालखीतून ढोल ताशांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. शहरातील पुरातन वेशीतील निलमणी मंदीरात असलेल्या मुर्तीची उत्सव मुर्तीची स्थापना दहा दिवसांच्या काळात केली जाते. गणेशत्सोवाच्या या काळात सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाच आयोजन निलमणी मंदीर ट्रस्ट तर्फे केले जाते.