मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाणी टंचाईचे शहर अशी ओळख असलेल्या मनमाड शहरालतील नागरीकांना पुन्हा एकदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. तीव्र उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत असल्याने पाणी कपातीचे संकेत नगर परिषदेने दिले आहे. अगोदरच महिन्यातून केवळ दोन वेळेस शहराला पाणीपुरवठा होत असतांना आता हे संकट शहरावर आले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणा-या वागदर्डी धरणातील पाणी पातळी कमी होत असून सध्या एक महिना पुरेल इतका पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे आहे ते पाणी पावसाळ्यापर्यंत पुरवावे लागणार आहे. यापुढे शहराला पाणी पुरवठ्याचे दिवस आणखी वाढवावे लागणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात येत आहे. संभाव्य पाणी टंचाईचे संकट पाहता पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन मे महिन्याच्या अखेरीस मिळावे अशी मागणी पालिका प्रशासनाने केली आहे…