मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टीम केट व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज मनमाड शहरा मध्ये ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सहित विदेशी कंपनीच्या वस्तूंची होळी करण्यात आली. यावेळी ऑनलाइन कंपनीच्या विरोधात लहान व मध्यम व्यापाऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. यावेळी व्यापा-यांनी ॲमेझॉन व फ्लिपकार्टचे विरोधात घोषणाही दिल्या.
य़ा आंदोलनात मनमाड मधील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केटचे राज्य सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले. मार्गदर्शनपर भाषण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक, अरुण सोनवणे, सुरेश लोढा व मनोज जंगम यांनी केले. या आंदोलनात व्यापारी महासंघ अध्यक्ष राजेंद्र पारीक,अखील भारतीय व्यापारी महासंघाचे राज्य सचिव कल्पेश बेदमुथा, सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अरुण सोनवणे, ज्येष्ठ व्यापारी गुरूदीपसिंग कांत, सराफ असोसिएशनचे संघटक सुरेशशेठ लोढा, मनोज जंगम, अनील गुंदेचा, राकेशशेठ ललवाणी, मनमाड केटचे नूतन अध्यक्ष चेतन संकलेचा, उपाध्यक्ष योगेश भंडारी, कुलदीपसिंग चोटमुरादी, पंकज बुरड, राजुशेठ गुप्ता, परेश बुरड, संदेश बेदमुथा, कुणाल ओस्तवाल, अमित लोढा, नितीन आहिराव, कुमार मेहानी, सचिन बेदमुथा, दिपक शर्मा, अमोल देव, हकिम मारू, प्रमोद भाबड, ललीत धांदल मनमाड शहर व्यापारी महासंघ व टीम कॅटचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.