मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड-नांदगाव रोडवरील पानेवाडी शिवारातील हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडीयन आयल गॅस कंपनी समोर नांदगांवकडून मनमाडकड़े भरधाव वेगाने मुरमाने भरलेला डंपर रस्त्याच्या कडेला दोन फूट उंच फुटपाथ तोडून चहाच्या टपरित घुसला. सुदैवाने टपरीवर उभे असलेले ग्राहक बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र चहा टपरीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. कंपनीच्या दोन्ही बाजूने वाहने राहत असल्याने चालकांचे नियंत्रण सुटते. त्यातून अपघात होत असतात. त्यामुळे कंपनीसमोरील बेकायदा उभ्या राहणाऱ्या वाहनांचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे.