अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड शहर व परिसरात गेल्या दीड महिन्यापासून होत असलेल्या पावसामुळे यंदा वागदर्डी धरणात साधारण तीन फुटाने पाणी साठा वाढला आहे. पालखेड धरणातून ओव्हरफ्लोचे सुटलेले पाणी पाटोदा साठवण तलावात घेऊन नंतर ते वागदर्डी धरणात घेतले जाते. सध्या ६२ टक्के इतका पाणी साठा झाला आहे. तो दोन महिने पुरेल इतका सध्य परिस्थितीला उपलब्ध झाला आहे. पावसाचे दिवस पाहता यंदा ही धरण ओव्हफ्लो होऊन भरुन वाहणार अशी चिन्ह दिसत आहे.