मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे नांदगाव तालुका संपर्क प्रमुख व माजी नगरसेवक प्रवीण नाईक यांच्यावर सरकारी कामात अडथळ आणल्याप्रकरणी ३५३ अन्वये मनमाड पोलिसात दाखल केला. हा गुन्हा खोटा असून या गुन्ह्याची सीबीआय मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी शिवसैनिकांसह नाईक यांनी स्मशान भूमीत धरणे आंदोलन सुरू केले आहे
या आंदोलनाबाबत नाईक यांनी सांगितले की, रेल्वेतून पडलेल्या व्यक्तीला आरपीएफ कडून वेळीच मदत मिळाली नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेची विचारणा केल्यानंतर त्याचा राग मनात धरून आरपीएफने खोटी फिर्याद दिली. त्यानंतर शहर पोलिसांनी त्याची शहनिशा आणि चौकशी न करता गुन्हा दाखल केला. या सर्व गुन्ह्यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी थेट मनमाडच्या स्मशान भूमीत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.