मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेदांत फॉक्सकॉन प्रकरण आता चांगलेच राजकीय वळण घेत आहे. फडणवीस-शिंदे सरकारच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प गुजराथ मध्ये गेल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी मनमाडमध्ये निदर्शने केली. या आंदोलनाच्या वेळी मंडल अधिकारी कार्यालयावर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत शिंदे सरकारचा निषेध केला. महाराष्ट्रातील तरुणांना मिळणारी रोजगाराची संधी हिरावली गेली असे सांगत आपला संतापही व्यक्त केला. या घटनेचा नाशिक जिल्हयात सलग दुस-या दिवशी ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे.