मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार राजेंद्र देशमुख व अल्ताफ खान यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हे दोन्ही नेते शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत कार्यरत होते. राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते ठाकरे यांच्या सोबतच होते. पण, त्यांनी अचानक शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मनमाडमध्ये ठाकरे गटाला मोठा फटका बसला.
आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांमुळे हे पदाधिकारी शिंदे गटात आले आहेत. परिणामी कांदे यांचे नांदगाव मतदारसंघातील वजन वाढले आहे. यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, फरहान खान, सुनील हांडगे, राजाभाऊ भाबड, साईनाथ गिडगे, मयूर बोरसे, बबलू पाटील, नाना शिंदे, योगेश इमले, आसिफ शेख, मिलिंद उबाळे, महेंद्र शिरसाट, लाला नागरे, दिनेश घुगे, सचिन दरगुडे, पंकज जाधव, उमेश ललवाणी, निलेश ताठे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार राजाभाऊ देशमुख, माजी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अल्ताफ खान, माजी उपजिल्हाप्रमुख नाना शिंदे, काँग्रेस नगरसेवक मिलिंद उबाळे, युवासेना स्वराज देशमुख, यांचा पक्ष प्रवेश यावेळी झाला. या पक्ष प्रवेशामुळे मनमाड मध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाला हादरा बसला आहे.