मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ,बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मनमाड येथील आरपीआय कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोर्चा काढत पाटील यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर जोडे मारो आंदोलन केले.