मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन वरील छातावर चढून अज्ञात तीस वर्षीय इसम हाय व्होल्टेज असलेल्या रेल्वे ओव्हर हेड वायरवर उडी मारल्याने गंभीर जखमी झाला मात्र नाशिक येथे उपचारासाठी नेत असतांना त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेहमी गजबजलेल्या मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात रविवारी दुपारी स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर बेंगलोर हून दिल्लीकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस स्थानकात प्रवेश करीत असताना स्थानकातील छतावर असलेल्या ३० वर्षीय अज्ञात तरुणाने छतावरून रेल्वेच्या हाय होल्टेज ओव्हर हेड वायरवर उडी मारली.
विजेचा शॉक जबर असल्याने तो स्थानकात प्रवेश करीत असलेल्या कर्नाटक एक्सप्रेसच्या छतावर कोसळला. सदर घटना लोहमार्ग पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अज्ञात तरुणाला मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार याकरिता घेऊन गेले. मात्र गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले. दरम्यान नाशिक येथे उपचारासाठी घेऊन जात असताना तीस वर्षीय अज्ञात तरुणाचा मृत्यू झाला. मात्र सदरील तरुण हा मनोरुग्ण असल्याची चर्चा सर्वत्र होत होती.
? *मनमाडमध्ये माथेफिरुने धावत्या ट्रेनवर मारली उडी*
(बघा थरारक व्हिडिओ)
https://t.co/4ddZsNprRD#indiadarpanlive #nashik #manmad #youth #jump #running #railway pic.twitter.com/GcV59v2G8D— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 16, 2023
Manmad Railway Station Youth Jump Electric Wire