मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मूर्तिजापूर-माना खंड दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे रुळाखालील भराव वाहुन गेल्याने त्याचा मध्य रेल्वेच्या वाहतूक परिणाम झाला आहे. त्यामुळे रात्रीपासून अनेक गाड्या ३ ते १३ तास विलंबाने धावत असून अनेक प्रवाशी मनमाड स्थानकात अडकून पडले आहेत .
या प्रवाशांना गाड्यांची ताटकळत वाट पाहण्याची वेळ आली आहे. वर्धा – भुसावळ मेमू व नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. अनेक गाड्या विलंबाने धावत आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याने प्रवाश्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशात काही ठिकाणी अशाच घटना घडल्या आहे. त्यामुळे काही ठिकाणचे रेल्वेचे टाइम टेबल बिघडले आहे. या घटनेमुळे मात्र प्रवाशांचे हाल होत आहेत.