मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोटाची खळगी भरण्यासाठी रेल्वेने लखनऊ ते पुणे प्रवास करणाऱ्या गोविंद पासवान आणि सुमन पासवान या दाम्पत्याच्या पाच महिन्याच्या गोडस बाळाचा प्रवासात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या बाळाला ताप आलेला होता आणि त्याची हालचाल बंद झाली.
रेल्वे मनमाड रेल्वे स्थानकात आली. त्याचवेळी आपले मूल गेल्याचे समजताच आईने जोरदार हंबरडा फोडला. मृत मुलाला छातीला लावून आई व बाळाचे वडील धायमोकळून रडत होते. हृदय पिळवून टाकणाऱ्या या प्रसंगांने सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. ही घटना समाजात मनमाडच्या मिलींद सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यानी पासवान कुटूंबियांना धीर देत या बालकाचा मनमाड येथे दफनविधी करून माणुसकीचे दर्शन घडविले.
Manmad Railway 5 Months Baby Death