अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड परिसरात पाऊस झालेला असल्याने सर्वत्र हिरवाई पसरलेली आहे. मनमाड जवळच्या माळेगाव घाट माथ्यावरील नारायणगाव,घाडगेवाडी परिसरात निसर्गरम्य वातावरण आल्याने या ठिकाणच्या जंगलात मोर, हरीण यांचे वास्तव्य आहे. सध्या ढगाळ वातावरण असल्याने मोरांचा आवाज कानी पडतोय तर या धुंद वातावरणात मोर पिसारा फुलवून नाचत असताना पहावयास मिळताय.