मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज माघारीवरून दोन गटात बाचाबाची होऊन हाणामारी जोरदार राडा झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोरच राडा झाल्याने एकच गोंधळ उडाला.
राडा झाल्यामुळे काही तणावाचे वातावरण पसरले होते. या गोंधळानंतर बाजार समिती कार्यालयासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या आजच्या दिवशी बाजार समितीच्या कार्यालयात माघारीसाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. मनमाड बाजार समितीमध्ये विद्यमान आमदार सुहास कांदे विरुद्ध पाच माजी आमदार अशी लढत होणार असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.