मनमाड – शेतकऱ्यांना पिक कर्ज व शेती विषयक कर्ज देण्यात बॅंकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी आल्यावर मनमाड स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांना आमदार सुहास कांदे यांनी पत्र देऊन सूचना वजा इशारा दिला. याप्रसंगी शाखा प्रबंधकांना हे पत्र जि.उपप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयुर बोरसे, गुलाब भाबड यांनी दिले. यावेळी त्यांनी बँकेच्या अधिका-यांशी चर्चा केली. या चर्चेत मोहेंगाव येथील शेतकरी किशोर हारदे, दत्तात्रय शिंदे, जीवन गंधाक्षे, दिगंबर निकम, दिनेश गायकवाड, राजू मंसुरी, गणेश गंधाक्षे, खंडेराव हरदे, धर्मा मुसनर,बापूराव हरदे, अंबादास गंडाक्षे व इतर शेतकरी बांधवानी त्यांच्या अडचणी व समस्या मांडल्या. शिवसेना शिष्टमंडळासमोर शाखा प्रबंधक यांनी त्या लवकरच सोडविण्याबाबत आश्वासन दिले. या अडचणी व समस्या सुटल्या नाही तर शिवसेना आंदोलनाचा पवित्रा घेईल व होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही संबधीत अधिकारी यांची राहील इशाराही यावेळी देण्यात आला.