गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनमाडला घराघरात समीर भुजबळांच्या वचननाम्याचे वाटप…डॉ. शेफाली भुजबळ यांनी घेतल्या मतदारांच्या भेटी

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2024 | 4:30 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20241117 WA0356 2

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मनमाड शहराच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन असलेल्या वचननाम्याची सध्या शहरात जोरदार चर्चा आहे. मनमाड-नांदगाव-मालेगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी हा वचननामा जनतेसमोर मांडला आहे. त्यात मनमाड शहरामध्ये भव्य उड्डाणपूल,अत्याधुनिक रेल्वे स्टेशन, शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आदींचा समावेश आहे.

समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ डॉ. शेफाली भुजबळ यांच्या नेतृत्वात शहरातील गांधी चौक, पिंपळवाडा, कुंभारवाडा, मुक्तांगण जिमखाना आदी परिसरात वचननामा घरोघरी देण्यात आला. यावेळी योगिता पाटील, स्वरूपा खेडकर, मीनाक्षी काकळीज, अपर्णा देशमुख, माया झाल्टे, पूजा वाघ आदी महिला सहभागी झाल्या.

मनमाड शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याचा संकल्प भुजबळ यांनी सोडला आहे. तसेच या शहरामध्ये मुलभूत सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्यात अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, भूमिगत गटारी, भूमिगत जलवाहिन्या, घंटागाडीची दररोज उपलब्धता आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, समीर भुजबळ हे खासदार असताना मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक शहरामध्ये भव्य उड्डाणपूल साकारला. त्याच धर्तीवर मनमाड शहरामध्ये पुणे इंदूर महामार्गावर उड्डाणपूल साकारण्याची घोषणा भुजबळ यांनी केली आहे. एकूण १२ पानी असलेल्या वचननाम्याचे शहराच्या सर्वच भागात स्वागत होत आहे. पहिल्यांदाच मनमाड शहराच्या सर्व समस्या आणि अडचणींचा एवढा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे विकासाचा भुजबळ पॅटर्न आम्हाला हवा आहे. अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे.

सोनार गल्ली, सुभाष रोड परिसरात मनमाड शहराध्यक्ष व मनमाड बाजार समितीचे सभापती दीपक गोगड,आनंद बोथरा आदी सहभागी झाले येत्या २० तारखेला मतदान यंत्रावरील शिट्टी या निशाणी शेजारील बटण दाबून समीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन डॉ.भुजबळ यांच्याबरोबरच अन्य महिलांनी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अपघाताची मालिका सुरुच…वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू

Next Post

सायबर भामट्यांनी तरूणास साडे सात लाख रूपयांना लावला ऑनलाईन चुना

Next Post
crime11

सायबर भामट्यांनी तरूणास साडे सात लाख रूपयांना लावला ऑनलाईन चुना

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011