मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील चाकरमान्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेल्या मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसला ४९ वर्ष झाल्याने सुपरवायझर रोहित भालेराव यांच्या संकल्पनेतून पंचवटी एक्सप्रेसच्या इंजिनला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पार्क स्टाफ,सी.एन,डब्लू व एटीएल स्टाफ सर्वांनी मिळून केक कापून व लाडू वाटप पंचवटी एक्सप्रेसच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. गेल्या ४९ वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेत अविरत धावणारी पंचवटी एक्सप्रेस अशीच सुरु राहो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.