मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव-मनमाड मतदारसंघात दूषित असलेले वातावरण बदलण्यासाठी उमेदवारीची घोषणा काल माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली. या घोषणेनंतर त्यांच्या उमेदवारीला सर्व स्तरातून पाठींवा मिळत आहे.
आज मनमाड येथील कार्यालयात नगरसेवक संजय निकम, नगरसेवक संतोष अहिरे, नगरसेवक रवींद्र घोडेस्वार यांनी समीर भुजबळ यांची भेट घेत जाहीर पाठिंबा दर्शविला.
यावेळी भयमुक्त नांदगाव आणि नांदगावच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भुजबळ यांना पाठींबा देत असल्याचे सर्व नगरसेवकांनी सांगितले.