मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्व.बाळासाहेब ठाकरे करंजवन-मनमाड या आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या महत्वकांक्षी पाणी पुरवठा योजनेचे काम अखेरच्या टप्प्यात आले असून ३६९ कोटीच्या कामाचे करंजवन ते मनमाड पाईपलाईन पूर्ण होऊन मनमाड जवळच्या भारत नगर जवळील फिल्टर हाऊस पर्यंत पाणी पोहचल्याने या पाण्याचा जलपूजनाचा कार्यक्रम शिवपुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते पार पडला.
आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या उपस्थित धार्मिक विधी करत जलपूजन करण्यात आले. तर जल पूजना नंतर, पाईप लाईनच्या व्हॉल्व्हची चक्री फिरवून त्याचे उदघाटन करण्यात आले. ५५ वर्षा पासून मनमाड शहराला पाण्याची टंचाई जाणवत होती. मात्र आता करंजवन ते मनमाड अशी थेट पाईप लाईन झाल्याने मनमाड शहराचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघाला असल्याचे कौतुक यावेळी पंडित मिश्रा यांनी केले.